रत्नागिरीत पूर; महामार्गावरील वाहतूक ठप्प, शेती, घरे पाण्याखाली

199

जिल्ह्यात सुरु असलेल्या संततधार पावसाने जवळपास सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. बावनदी,काजळी नदीला पूर आला असून निवळी, बावनदी, तोणदे, सोमेश्वर, चांदेराई परिसरात पुराचे पाणी शिरून शेती, दुकाने आणि घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे.बावनदीला पूर आल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

चाकरमान्यांचा खोळंबा

जगबुडी, नारिंगी नद्यांच्या पाठोपाठ बावनदीनेही धोक्याची पातळी ओलांडल्याने मुंबई -गोवा महामार्गावरील वाहतुक बंद करण्यात आली आहे. बावनदी पुलाजवळ वाहनांच्या रांगा लागल्या असून गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांचा खोळंबा झाला आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर आज सकाळी कायम राहिला. वादळी वाऱ्य़ासह अतिवृष्टीने रत्नागिरीला झोडपून काढले.

आपली प्रतिक्रिया द्या