
सामना प्रतिनिधी, रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यात 04 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात एकूण 1382 मिमी तर सरासरी 153.56 मिमी पाऊस झाला आहे. सर्वाधिक पावसाची नोंद दापोली तालुक्यात 225 मिमी तर सर्वात कमी पावसाची नोंद गुहागर तालुक्यात 81 मिमी झाली आहे. तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे असून आकडे मिलीमीटर मध्ये आहेत. मंडणगड 170 मिमी, दापोली 225 मिमि, खेड 165 मिमि, गुहागर 81 मिमि, चिपळूण 158 मिमि, संगमेश्वर 180 मिमि, रत्नागिरी 113 मिमि, लांजा 170 मिमि आणि राजापूर तालुक्यात 120 मिमि पाऊस झाला आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे 04 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 10 वाजता प्राप्त झालेल्या नुकसानीच्या प्राथमिक अहवालानुसार दापोली तालुक्यात मौजेपांगारी येथील उमेश गजानन खैरे यांच्या घराचे पावसामुळे अंशत: 30 हजार रुपयांचे नुकसान, मौजे जुईकर येथील सुधीर काशीनाथ चौधरी यांच्या घराचे पावसामुळे 3 हजार 400 रुपयांचे अशंत: नुकसान, मौजे आसुद येथील सुभद्रा काशीनाथ जाधव यांच्या घराचे पावसामुळे 1 हजार 500 रुपयांचे अंशत: नुकसान, मौजे तामसतीर्थ येथील रंग बाजकर यांचे घराचे 50 हजाराचे तर रमेश वजीर यांच्या घराचे 50 हजार रुपयांचे अंशत: नुकसान, मौजे करजगाव येथील रस्त्याचे साईट पट्टी वाहून गेल्याने अंशत: 2 लाख 50 हजाराचे नुकसान, मौजे मुकदावाडी येथील काजवे नदीवरील पुल वाहून गेल्याने अंशत: 3 लाखाचे नुकसान झाले असून मौजे कर्दे मुरुड येथील समुद्र किनारी रस्ता खचला आहे.
मौजे आंजर्ले येथील रुपेश बोरकर यांच्या घराचेअशंत: नुकसान, मौजे जालगाव येथील जालगावंकर यांच्या घराचे पावसामुळे अंशत: 20 हजारांचे नुकसान, मौजे गावतळे येथील श्रीकांत सुरेश पवार यांच्या घराचे पावसामुळे अंशत: 30 हजार रुपयांचे नुकसान, मौजे फणगुस येथील सभागृहावर झाड पडल्याने अशंत: 6 हजार रुपयांचे नुकसान, मौजे कुंभवे येथील रुपाली महादेव शिर्के यांच्या घराचे पावसामुळे 5 हजार 800 रुपयांचे नुकसान, मौजे रोरवी येथील श्रीराम गणू मांडवकर यांच्या घराचे पावसामुळे 11 हजार रुपयांचे अशंत: नुकसान, मौजे कोळबांद्रे येथील महादेव नाना कळबंकर यांच्या घराचे पावसामुळे 4 हजार 500 रुपयांचे नुकसान, मौजे पावणाळ येथील अर्जुन बाबाजी वाणी यांच्या घराचे पावसामुळे अंशत: 2 हजार780 रुपयांचे नुकसान, मौज आडखळ लाडघर रस्त्याच्या कडेला समुद्राच्या उधाणामुळे रस्त्याची साईडपट्टी तुटली आहे. एकेरी वाहतूक सुरू आहे.
खेड तालुक्यात मौजे शिव बु. येथे रस्त्यावर झाड पडल्याने सा.बा. विभागाकडून झाड हटविण्याचे काम सुरू आहे. मौजे खेड येथील 03 ऑगस्ट 2019 रोजी जगबुडी नदीच्या पातळी वाढ झाल्याने सदर पुलावरील वाहतूक बंद होती, पाणी कमी झाल्यानंतर वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मौजे चिंचघर कोरेगाव येथील पुलावरुन पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. चिपळूण तालुक्यात 03 ऑगस्ट 2019 रोजी वाशिष्ठी नदीच्या पातळीत वाढ झाल्याने पुलावरील वाहतूक बंद केली होती. पाणी कमी झाल्यानंतर वाहतूक सुरु करण्यात आली आहे. संगमेश्वर तालुक्यात मौजे गोळवली-करजुवे रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक बंद, दरड हटविण्याचे काम सुरु आहे.
























































