
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसामुळे प्रयागराज, काशीसह तब्बल 12 जिल्हे पुरात बुडाल्याचे चित्र आहे. गंगा-यमुना कोपली आहे. वाराणसी आणि प्रयागराजमध्ये गंगेचे पाणी एक लाखांहून अधिक घरात घुसले. आज पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास गंगेच्या पाण्याची पातळी धोक्याच्या चिन्हापेक्षा तब्बल 20 सेमीवर गेली.
आज राज्यातील 71 जिह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला. 7 जिह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर 38 जिह्यांना पाऊस आणि वादळाचा इशारा देण्यात आला. 18 जिह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आणि 20 जिह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाटण्यात 666.20 मिमी पावसाची नोंद झाली असून रस्त्यावर 2 फुटांपर्यंत पाणी साचले आहे. मध्य प्रदेशातील 9 जिह्यांमध्येही मुसळधार पाऊस झाला. तसेच हिमाचल प्रदेशातील शिमला येथे अनेक भागात भूस्खलनाच्या घटना घडल्या.
n राजस्थानातील 9 जिह्यांमध्ये पावसाने कहर केला. बिकानेरच्या नोखा येथे दोन घरे कोसळली.
n उत्तर प्रदेशात गंगा-यमुना आणि बेतवा नद्या पूरग्रस्त झाल्या असून काशीतील सर्वच्या सर्व 84 घाट गंगेत बुडाले. प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुनेच्या पाण्याने 10 हजार घरे भरली.
n आसाम, मेघालयसह 5 जिह्यांमध्ये अतिवृष्टीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर बिहार-उत्तराखंडसह 6 जिह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.