मुंबईकरांच्या पाण्याचे मोजमाप होणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबईत अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरठा होतो तर अनेक भागांत चांगला पाणीपुरवठा होतो. त्यामुळे मोठ्या संख्येने मुंबईकरांवर पाणीपुरवठ्याच्या बाबतीत अन्याय होतो. मुंबईत कुठे नेमका किती पाणीपुरवठा होतो याबाबतचे मोजमाप करण्याची कुठलीही यंत्रणा महापालिकेकडे नाही. केवळ 10 टक्के पाणीकपात असतानाही अनेक भागातील लोकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते ही बाब लक्षात घेऊन प्रत्येक वॉर्डात समसमान पाणीपुवठा व्हावा किंवा मुंबईकरांना पुरेसे पाणी मिळावे यासाठी प्रत्येक झोनमधील जलवाहिन्यांवर फ्लोमीटर बसवण्यात येणार असून पाण्याचा दाब मोजण्यासाठी दाबमापक यंत्र बसवण्यात येणार आहे. त्यानुसार मोजमाप घेऊन पाणीपुरवठा करण्यात येईल अशी माहिती राज्य सरकारने विधान परिषदेत दिली.