चारा घोटाळा लालूंना जामीन, पण मुक्काम तुरुंगातच

36

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

देवघर कोषागराशी संबंधित चारा घोटाळा प्रकरणात राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना रांची उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र चाईबासा-दुमका कोषागारप्रकरणी त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावल्याने त्यांना जेलमध्येच मुक्काम करावा लागणार आहे.

देवघर कोषागार प्रकरणात शिक्षेचा अर्ध्याहून अधिक अवधी पूर्ण झाल्याचा आधार घेऊन लालूप्रसाद यादव यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. सीबीआयने त्यांना जामीन मिळू नये याकरिता प्रयत्न केले, मात्र न्यायालयाने प्रत्येकी 50 हजार रुपयांच्या हमीवर जामीन मंजूर केला. तसेच पासपोर्ट न्यायालयात जमा करावा, असे आदेशही कोर्टाने दिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या