चारा घोटाळ्यात लालू दोषीच, ११० दिवसानंतर पुन्हा तुरुंगात रवानगी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । रांची

चारा घोटाळा प्रकरणी शिक्षा भोगत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव गुरुवारी रांचीतील सीबीआय कोर्टात हजर झाले. १० मे पासून आपला मुलगा तेजप्रताप यादव याच्या लग्नानिमित्त ते बाहेर होते. तसेच त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू होते. मात्र आज त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर त्यांना दोषी ठरवून त्यांची रवानगी बिरसा मुंडा तुरुंगात करण्यात आली आहे. त्यामुळे आता तब्बल ११० दिवसानंतर लालू तुरुंगात परततील.

दरम्यान, लालू यादव यांना आधी तुरुंगात नेण्यात येईल त्यानंतर त्यांना रिम्स इस्पितळात दाखल करण्यात अशी माहिती देण्यात येत आहे.