
हिवाळ्यात पुरेसे ऊन पडत नसल्याने धुतलेल्या कपडय़ांमध्ये ओलसरपणा राहण्याची आणि दुर्गंधी येण्याची समस्या भेडसावते. त्यामुळे कपडय़ांना कुबट वास येतो. लिंबाचा रस कपडय़ांमधील दुर्गंधी दूर करण्यासाठीही खूप फायदेशीर आहे. ओले कपडे धुतल्यानंतर त्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका आणि हलक्या हाताने कपडे नीट चोळा.
व्हिनेगर हाद्धा एक नैसर्गिक उपाय आहे, जो कपडय़ांची स्वच्छता आणि ताजेपणा दोन्ही राखण्यास मदत करतो. याशिवाय बेकिंग सोडा कपड्यामधील दुर्गंधी शोषून घेण्यास आणि स्वच्छता राखण्यास मदत करतो.





























































