
हिवाळ्यात केस कोरडे पडतात. कोरडय़ा व निस्तेज केसांसाठी काही घरगुती उपाय करता येतात. रसायनांच्या अति वापराशिवाय आपण केसांच्या मुळांची निगा राखू शकतो. त्यांना चमकदार, व मऊ बनवू शकतो. कोरफड टाळूला लावल्याने ओलावा निर्माण होतो. त्यामुळे केस हायड्रेट होऊन, चमकदार होतात.
दह्याचा वापरही करता येतो. दह्यामध्ये प्रथिने असतात, ज्यामुळे केसांना पोषण मिळते, केसांचा पोत सुधारतो.मध आणि ऑलिव्ह ऑइलचे मिश्रण केसांना कडक आणि दाट बनवते. हे मिश्रण केसातील हायड्रेशन वाढवून, केसांना चमकदार बनवते. टाळूवर नारळाच्या कोमट तेलाने मालिश करणेही चांगले.





























































