
हिवाळ्यातील थंडीमुळे अनेकांची त्वचा कोरडी पडते. काहींना अंगावर खाज येते. थंडीत कोरडी त्वचा पडू नये, यासाठी काही गोष्टी करा. सर्वात आधी जास्त गरम पाण्याने आंघोळ करणे टाळा. कोमट पाण्याने आंघोळ करा आणि आंघोळीचा वेळ कमी करा. पुरेसे पाणी प्या, ज्यामुळे त्वचा आतून हायड्रेटेड राहण्यास मदत होते.
आंघोळीसाठी त्वचेला कोरडी न करणारे सौम्य आणि सुगंधविरहित साबण वापरा. त्वचेचा थेट थंड वाऱयाशी संपर्क टाळण्यासाठी योग्य कपडे घाला. दुपारच्या वेळी जास्त उन्हात जाणे टाळा. यामुळे त्वचा कडक होऊ शकते. व्हिटॅमिन-युक्त आहार घ्या, व्हिटॅमिन सी त्वचा हायड्रेट ठेवण्यास मदत करते.


























































