
तुमचे पॅनकार्ड हरवले किंवा खराब झाले तर घाबरून जाण्याची गरज नाही. आता तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून ई-पॅनकार्ड सहजपणे डाऊनलोड करू शकता.
देशात पॅनकार्ड मुख्यत्वे NSDL आणि UTIITSL या दोन एजन्सी बनवतात. याशिवाय आता आयकर विभागाच्या वेबसाईटवरूनही ‘इन्स्टंट पॅन’ बनवता येते.
पॅनकार्ड बनवताना तुम्हाला मिळालेल्या ई-मेल किंवा एसएमएसमध्ये तुमच्या एजन्सीचे नाव समजू शकते. त्यानंतर त्या एजन्सीच्या वेबसाईटवरून ई-पॅन डाऊनलोड करा.
एजेन्सीच्या अधिकृत वेबसाईटवर पॅन नंबर, आधार नंबर आणि जन्मतारीख टाका. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरील ओटीपी टाका. त्यानंतर तुम्हाला छोटे शुल्क भरावे लागेल.
जर तुम्ही आधारकार्डच्या मदतीने इन्स्टंट पॅन बनवले असेल, तर आयकर विभागाच्या वेबसाईटवर जा. हे ई-पॅनकार्ड सर्व सरकारी आणि खासगी कामांसाठी पूर्णपणे वैध आहे.


























































