
बऱ्याचदा घरात झुरळ झाल्यानंतर त्यांना घालवणे अवघड असते. जर घरातील झुरळ घालवायची असतील तर सर्वात बेकिंग सोडा आणि साखर समान प्रमाणात मिसळून झुरळे फिरतात अशा ठिकाणी ठेवा. साखर झुरळांना आकर्षित करते आणि बेकिंग सोडा त्यांना मारतो. बोरॅक्स आणि साखर समान प्रमाणात मिसळा व झुरळांच्या मार्गावर टाका.
साखर त्यांना आकर्षित करते आणि बोरॅक्स विषारी म्हणून काम करते. स्वयंपाकघर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. अन्नकण आणि खरकटे त्वरित साफ करा. घरात पुठेही पाणी साचू नये याची काळजी घ्या. गळणारे नळ दुरुस्त करा. अन्नपदार्थ आणि इतर वस्तू हवाबंद डब्यांमध्ये ठेवा, जेणेकरून झुरळांना अन्न मिळणार नाही.

























































