हे करून पहा – झुरळांचा त्रास कमी करण्यासाठी

घरात स्वयंपाकघर, सिंक किंवा कपाटांमध्ये झुरळं दिसतात. झुरळं दिसणे चांगले नसते. झुरळांमुळे खाद्यपदार्थ दूषित होतात आणि त्यामुळे आजार पसरतात.

झुरळे घालवण्यासाठी घरात असलेल्या लिंबाचा वापर केल्यास दीर्घकाळ फायदा होऊ शकतो. झुरळांमध्ये सायट्रिक ऑसिडचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे झुरळे त्यापासून लांब राहतात.

झुरळांचा प्रवेश हा ड्रेनेज पाईपमधून होतो. या पाईपमध्ये दर 2-3 दिवसांनी लिंबांचा रस आणि कोमट पाणी रात्री झोपण्यापूर्वी टाकल्यास झुरळांचा त्रास कमी होण्यास मदत मिळते.