हे पदार्थ खा, रोगप्रतिकारक शक्ती वाढवा

4872

सध्या जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. यापासून बचाविण्यासाठी रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. तर दुसरीकडे उष्णतेचे प्रमाण देखील वाढत चालले आहेत. त्यामुळे या काळात कोणते पदार्थ खाल्यास तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढू शकते याबद्दल घेतलेला हा आढावा. तुमच्या रोजच्या आहारातच या काही पदार्थांचा समावेश करा आणि तुम्ही तुमची रोगप्रतिकारकशक्ती वाढवू शकता. फक्त या पदार्थांचा समावेश करून व्यवस्थित प्रमाणात हे पदार्थ आपण खाण्याची गरज आहे.

संत्रे आणि लिंबू
व्हिटॅमिन सी ने परिपूर्ण असे पदार्थ या काळात खाणे उत्तम मानले जाते. संत्री व लिंबूमधील व्हिटॅमिन सी मुळेच रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यास देखील मदत होते. हे पदार्थ खाल्ल्याने ताजेतवानेदेखील वाटते त्याशिवाय हे पदार्थ शरीराला थंडावा देतात. दररोज एकदा दिवसातून लिंबू सरबत बनवून पिणे आवश्यक आहे. त्याशिवाय दररोजच्या जेवणात लिंबाचा वापर केल्यास अतिउत्तम. यामुळे तुम्हाला रोगप्रतिकारकशक्ती लवकर वाढवता येते.

कलिंगड आणि काकडी
कलिंगड आणि काकडी या दोन्ही पदार्थांत पाण्याचे प्रमाण जास्त असते. हे दोन्ही पदार्थ फक्त हायडेट्रशनसाठी नव्हे तर पचण्यासदेखील हलके असतात. त्यातील पोषक पदार्थांमुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यास मदत होते. याबरोबरच या दोन्ही पदार्थात कॅलरीजचे प्रमाण कमी असते त्यामुळे वजन कमी करण्यासाठीदेखील त्याचा उपयोग होऊ शकतो.

दही
दररोज एक वाटी दही खाल्ल्यास आपल्याला नक्कीच फरक जाणवेल. यामुळे आपल्याला ताजेतवाने वाटेल. दही शरीरासाठी थंड पदार्थ असल्याने उन्हाळ्यात दही खाणे कधीही उत्तम मानले जाते. दह्याच्या नियमित सेवनामुळे आपल्याला पचनक्षमता वाढविण्यास मदत मिळते. दह्यामध्ये व्हिटॅमिन डी असते. त्यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यास मदत मिळते.

आंबा
फळांचा राजा म्हणून प्रसिद्ध असणारा आंबा हा आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यास मदत करतो. त्यामुळे मे महिन्यात येणारा हा आंबा आपल्या आहारात असणं अत्यंत आवश्यक आहे. शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी जीवनसत्व अ महत्त्वाचे असते. आंब्यात अ जीवनसत्वे अधिक असल्याचे दिसून येते. त्यामुळे उन्हाळ्यात आंब्याचे सेवन केल्याने त्याचा आपल्याला फायदाच होतो.

पुदीना
पुदिन्याचा सुगंध आणि चव ही दोन्हीही आपल्याला नेहमीच आकर्षित करत असते. पुदिन्याच्या पानात अँटीऑक्साईडचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे शरीरातील घातक रॅडिकल कमी करण्यासाठी पुदीना मदत करतो. त्यामुळे रोजच्या जेवणात चटणी, पराठा किंवा इतर माध्यमातून त्याचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते.

आपली प्रतिक्रिया द्या