
ऋतूनुसार श रीरात बदल होत असतात हे नैसर्गिक आहे, श रीरातील उष्णता कोणत्या ना कोणत्या कारणाने बाहेर येत असते, त्यातीलच एक प्रकार म्हणजे पायांना भेगा पडणे, जखम होणे, त्यामुळे आपले तळपाय नाजूक बनतात याचा परिणाम म्हणजे आपल्याला चालताना प्रचंड वेदना होतात, पाय टेकता येत नाहीत. तसेच ही समस्या असल्यामुळे बाहेर पडणे अवघड होते कारण त्यामुळे उघड्या टाचा, पडलेल्या भेगा आपले व्यक्तिमत्त्व खराब करतात. ही एक सर्वसाधारण समस्या आहे जिचं निराकरण करणे शक्य आहे. तेही घरबसल्या घरगुती उपाय करून तुमच्या टाचा, पडलेल्या भेगा मिटवू शकता व कोमल चालता येईल अशा टाचा बनवू शकता.
आठवड्यातून एकवेळ पायांचे पे डी क्यू अ र करून घ्यावे.
पे डी क्यू अ र घरच्या घरीही करता येते. आपल्याला सहन होईल इतके गरम पाणी एका पसरट भांड्यात घेऊन त्यामध्ये शॅम्पू व थोडेसे मीठ टाकावे. काही वेळ त्या गरम पाण्यामध्ये पावले ठेवावीत व नंतर फूट स्क्रबर वापरून पावले गोलाकार घासावीत. परत थोडा वेळ तसेच त्या पाण्यात पाय ठेवून बसा, असे केल्याने तुमच्या पायातील भेगांमधील मृत पेशी निघून जातात व त्वचा मुलायम बनते. थोड्या वेळाने पाय पाण्यातून बाहेर काढून पुसून घ्या. भेगा पडलेल्या पायांना सर्वोत्तम उपाय म्हणजे पे ट्रो लि य म जेली होय. रात्री झोपताना पाय स्वच्छ धुवावे नंतर ते सुती कपड्याने पुसून घेऊन त्यात पे ट्रो लि य म जेली भरावी व पायमोजे घालून झोपावे.
कडुनिंबाचा पाला आयुर्वेदात खूप कारणांसाठी वापरला जातो.
हाच कडुनिंब बारीक वाटून त्याची पेस्ट पायांना लावल्यास भेगा कमी होतात. यानंतर घरी उपलब्ध असणारे मीठ, लोणी व आंबेहळद एकत्र करून भेगांना रोज लावल्यास भेगा नाहीश्या होऊन त्वचा मुलायम बनते. व्हॅसलिन हेसुद्धा त्वचा मुलायम होण्यासाठी वापरतात पण तिथे त्यासोबत आणखीन दोन वस्तू वापरायच्या आहेत त्या म्हणजे जैतून तेल आणि बोरिक पावडर हे सुदधा त्यात मिक्स करून हे मिश्रण भेगांना लावल्यास आराम मिळतो, वेदना कमी होतात.
हळदीमध्ये नारळाचं तेल कोमट करून पेस्ट करायची आणि रोज ती त्या भेगांमध्ये लावायची त्यामुळे तुम्हाला आराम मिळतो त्यातील जंतू मरतात तसेच मृत पेशी नाहीशा होतात व भेगा लवकर भरून येतात. ग्लिसरीन, गुलाबपाणी, लिंबाचा रस समप्रमाणात घेऊन त्याने पायांना मसाज केल्यास भेगा दूर होतात.
चंदन उगळुन त्याचा लेप लावल्यास परिणाम लवकर होतो. आठवड्यातून एकदा बदाम तेल कोमट करून तळव्यांना घासावे, धुळीमध्ये जाताना पायांना सॉ क्स घालावेत तसेच दररोज अंघोळ करताना प्यु मि क स्टो-न वापरून तळवे घासावेत. तसेच बाहेर जाताना, घरात चप्पल वापरावी व वरचेवर तळवे शक्य तितके स्वच्छ ठेवावे.