पतीने बळजबरीने केलेला संभोग हा बलात्कार नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पतीने पत्नीवर केलेल्या बलात्कार प्रकरणातील खटल्यात छत्तीसगड हायकोर्टाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. विवाहित पत्नीसोबत पतीने जबरदस्तीने किंवा तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध केल्यास बलात्कार होत नाही, असा निकाल छत्तीसगड उच्च न्यायालयाने दिला आहे. मात्र पत्नीचे वय 18 वर्षांखाली असू नये, असे निरीक्षणही कोर्टाने नोंदवले आहे. या प्रकरणात कोर्टाने पतीला आरोपमुक्त केले आहे. छत्तीसगड हायकोर्टातील जस्टीस एनके चंद्रवंशी यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. दुसरीकडे पतीने अनैसर्गिक कृत्य केल्या प्रकरणी मात्र आरोप निश्चित केले आहेत.