भाजपला मोठा धक्का, माजी नगरसेवक समीर देसाई शिवसेनेत!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपचे माजी नगरसेवक समीर देसाई यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. ‘मातोश्री’ निवासस्थानी झालेल्या या प्रवेश सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले. भाजपमधील अंतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी भाजपला रामराम केल्याचे बोलले जात आहे. त्यांची पत्नी राजूल देसाई या सध्या गोरेगावमध्ये भाजपच्या विद्यमान नगरसेविका आहेत. त्यामुळे देसाई यांच्या शिवसेना प्रवेशामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अवघ्या एका वर्षावर येऊन ठेपली असताना शिवसेनेत जोरदार ‘इनकमिंग’ सुरू झाले आहे. काँग्रेसमधील दिवंगत नेते गुरुदास कामत यांचे भाचे असलेल्या समीर देसाई यांनी नगरसेवक असताना अभ्यास आणि वक्तृत्चाच्या जोरावर पालिका चांगलीच गाजवली होती. मात्र त्यांनी काही वर्षांपूर्वी भाजपात प्रवेश केला होता.

समीर देसाई हे 2002 ते 2012 या कालावधीत काँग्रेसचे नगरसेवक होते. तर राजूल देसाई या 2017 च्या पालिका निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार लोकना चव्हाण यांचा साडेतीन हजार मतांच्या जोरावर पराभव करून विजयी झाल्या आहेत.