#WestBengalElection – माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिंह यांनी आज तृणमूल काँग्रेसमध्ये प्रेवश केला आहे. टीएमसीचा झेंडा हाती घेत त्यांनी पक्षात प्रवेश केला आहे. यशवंत सिंह हे बर्‍याच दिवसांपासून भाजपवर नाराज होते आणि त्यांनी अनेक प्रसंगी भाजपवर टीका देखील केली होती.

टीएमसीत प्रवेश केल्यानंतर भाजपवर टीका करताना यशवंत सिन्हा म्हणाले, ‘लोकशाहीची शक्ती ही लोकशाहीची संस्था असते. आज जवळपास सर्वच संस्था या कमकुवत झाल्या आहेत. यात देशाची न्यायव्यवस्थाही सामील आहे. आपल्या देशासाठी ही सर्वात मोठी धोक्याची बाब आहे.’

ते पुढे म्हणाले, ‘तृणमूल कॉंग्रेस मोठ्या बहुमताने सत्तेत पुन्हा येईल, यात काहीच शंका नाही. बंगालमधून संपूर्ण देशाला संदेश जायला हवा की जे काही मोदी आणि शहा दिल्लीमधून चालवत आहेत, आता हे सर्व देश सहन करणार नाही.’