
सीबीआयचे माजी संचालक अश्विनीकुमार यांनी आज सिमला येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. सिमलाचे पोलीस अधीक्षक मोहित चावला यांनी ही माहिती दिली. या आत्महत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी अश्विनीकुमार हे गेल्या काही दिवसांपासून नैराश्येत होते, असे सांगितले जाते.
2008 ते 2010 पर्यंत अश्विनीकुमार यांनी सीबीआय संचालक म्हणून काम पाहिले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी आरुषी तलवार हत्याकांडाबरोबरच देशातील अनेक महत्त्वाच्या घटनांचा तपास केला होता. आरुषी प्रकरणात तलवार यांच्या नोकराविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्याची त्यांनी तयारी केली होती, परंतु त्यांना त्यापासून रोखले गेले. त्यानंतर त्या प्रकरणाचा तपास त्यांच्याकडून काढून दुसऱया टीमकडे सोपवण्यात आला होता.






















































