बलात्कार प्रकरण, माजी नगरसेवक सिराज शेखला अटक

799

अमेरिकेत शिक्षणासाठी स्कॉलरशिप मिळवून देतो असे आमिष दाखवत नातेवाईक असलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून पसार झालेला माजी नगरसेवक मोहम्मद सिराज शेख अखेर पोलिसांच्या हाती लागला. गुन्हे शाखा युनिट-6 च्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या.

सिराज शेख हा शिवाजीनगर परिसरात नगरसेवक होता. त्याने ऑक्टोबर महिन्यात नातेवाईक असलेल्या मुलीला अमेरिकेत शिक्षणासाठी मदत करतो. तुला त्यासाठी स्कॉलरशिप मिळवून देतो असे सांगत सिराज शेखने मुलीवर बलात्कार केला होता. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बलात्कार, ‘पोक्सो’ अन्वये गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल होताच सिराज शेख फरार झाला. पोलीस त्याचा शोध घेत होते, परंतु तो लपून राहत होता. अखेर हा गुन्हा गुन्हे शाखेकडे वर्ग झाल्यानंतर प्रभारी पोलीस निरीक्षक दीपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अपर्णा जोशी, चंद्रकांत दळवी व पथकाने सिराज शेखचा शोध सुरू केला. सिराज शेख गोवंडी परिसरात आला असल्याची खबर मिळताच पोलिसांनी त्याला गुरुवारी अटक केली. 11 डिसेंबरला त्याने कोर्टात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.

आपली प्रतिक्रिया द्या