
पुलवामा प्रकरणात खळबळजनक गौप्यस्फोट करणारे जम्मू-कश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक हे गेल्या पंधरा दिवसांपासून आजारी असून उपचारासाठी त्यांना राम मनोहर लोहिया रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. दरम्यान, मलिक यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळले आहेत. जर माझ्याकडे पैसे असते तर मला खासगी रुग्णालयात उपचार मिळाले असते. मला ज्या प्रकरणात ते अडकवू इच्छितात ती निविदा स्वतः रद्द केली होती आणि पंतप्रधानांना देखील या प्रकरणात भ्रष्टाचार असल्याचे सांगितले होते असे मलिक यांनीच एक्स पोस्ट करत म्हटले आहे.