माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना सीबीआयचे समन्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोदी सरकारचा हलगर्जीपणा, अकार्यक्षमता आणि चुकीमुळेच पुलवामा येथे भयंकर दहशतवादी हल्ला होऊन 40 जवान शहीद झाले होते, असा गौप्यस्फोट जम्मू-कश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी नुकताच केला होता. या गौप्यस्फोटामुळे देशभरात खळबळ माजली. विरोधकांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. यावरून वातावरण ढवळलेले असतानाच आता केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) सत्यपाल मलिका यांना समन्स बजावून चौकशीसाठी बोलावले आहे. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स जनरल इन्श्युरन्समधील घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी सत्यपाल मलिक यांची चौकशी केली जाणार आहे.