माजी आमदार अरुण जगताप यांचे निधन

माजी नगराध्यक्ष व विधान परिषदेचे दोन टर्म सदस्य राहिलेले अरुणकाका बलभीम जगताप (67) यांचे आज शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

अरुण जगताप हे अहिल्यानगरच्या राजकारण आणि समाजकारणात ‘काका’ नावाने परिचित होते. त्यांची राजकीय कारकीर्द ही काँग्रेसमधून सुरू झाली. युवक काँग्रेसचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. नगरपालिकेचे नगराध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून सलग दोन वेळा स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषदेवर निवडून गेले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांचे ते वडील होत.