
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी कोरोनावर मात केलीय. त्यांना आज एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आलं आहे. मनमोहन सिंग यांना 19 एप्रिलला कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर दिल्लीतील एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होत. 88 वर्षीय मनमोहन सिंग यांनी कोरोनावरील लसीचे दोन्ही डोस घेतले होते. मात्र त्यांना मधुमेहाचा आजार देखील आहे.
Former PM Manmohan Singh discharged from AIIMS Trauma Centre in Delhi, after recovering from #COVID19: AIIMS Official
He was admitted here on April 19th. pic.twitter.com/YzjSJmZGmk
— ANI (@ANI) April 29, 2021
मनमोहन सिंग यांच्यावर दोन बायपास शस्त्रक्रिया देखील झाल्या आहेत. 1990 मध्ये त्यांची पहिली शस्त्रक्रिया इंग्लंडमध्ये झाली होती. तर 2004 मध्ये त्यांची एस्कॉर्ट रुग्णालयात अँजिओप्लास्टी झाली होती. 2009 मध्ये एम्स रुग्णालयात त्यांच्यावर दुसऱ्यांदा बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
दरम्यान, कोरोनाशी लढा देण्यासाठी मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाच उपाययोजना सुचविणारे पत्र लिहिले होते. पत्रात त्यांनी कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी लसीकरण आणि औषधांचा पुरवठा वाढविणे आवश्यक आहे असल्याचे म्हटले होते.


























































