
पुण्याचे माजी खासदार आणि केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारपणाशी झुंज देत होते. क्रीडा विश्वात त्यांच्या नावाचा दबदबा हा सर्वश्रुत होता. पुण्यातील खाजगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या जाण्याने पुण्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. कलमाडी यांच्या पार्थिवावर दुपारी २ च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
सुरेश कलमाडी यांनी भारतीय हवाई दलामध्ये पायलट म्हणून त्यांची कारकीर्द सुरु केली होती. पुणे फेस्टिव्हल आणि पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथाॅनच्या माध्यमातून त्यांनी पुण्याचे नाव जागतिक नकाशावर आणले. केंद्रीय मंत्री तसेच आॅलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम पाहिले.


































































