अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना कर्करोग

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कर्करोगाचे निदान झाले आहे. हा कर्करोग त्यांच्या हाडापर्यंत पसरला असून बायडेन यांच्या कार्यालयानेच रविवारी एका निवेदनाद्वारे याबाबतची माहिती दिली. गेल्या आठवड्यात 82 वर्षीय बायडेन यांना लघवी करताना त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांनी लगेच डॉक्टरांची भेट घेऊन विविध तपासण्या करून घेतल्या. त्यानंतर गेल्या शुक्रवारी त्यांना प्रोस्टेट कर्करोग झाल्याचे निदान झाले. प्रोस्टेट कर्करोग हा पुरुषांच्या प्रोस्टेट ग्रंथींमध्ये होणारा कर्करोग आहे.