माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सरकारी बंगला केला रिकामी

माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सरकारी बंगला रिकामी केला आहे. पदाचा राजीनामा दिल्यानंतर सहा आठवड्यांनंतर ते दक्षिण दिल्लीतील छतरपूर भागात असलेल्या एका खाजगी फार्महाऊसमध्ये शिफ्ट झाले आहेत. हा फार्महाऊस इंडियन नॅशनल लोकदल (INLD) नेते अभय चौटाला यांचा आहे, जो गडईपूर परिसरात आहे. धनखर यांना टाईप-८ सरकारी निवासाची व्यवस्था होईपर्यंत ते येथे राहणार आहेत.

जगदीप धनखड यांनी २१ जुलै रोजी आरोग्याच्या कारणास्तव उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला होता. त्यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट २०२७ पर्यंत होता. परंतु त्यांनी मान्सून सत्राच्या पहिल्याच दिवशी आपल्या पदाचा राजीनामा दिला. दरम्यान, आवास आणि शहरी विकास मंत्रालयाकडून धनखड यांच्याकडून सरकारी बंगल्यासाठी कोणतीही औपचारिक विनंती प्राप्त झालेली नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. “धनखर हे तात्पुरत्या स्वरूपात या खासगी फार्महाऊसमध्ये राहणार आहेत, जोपर्यंत त्यांना टाईप-८ अधिकृत निवास मिळत नाही,” असे ते म्हणाले.