
टोयोटोची फॉर्च्युनर ही दणकट कार म्हणून ओळखली जाते, परंतु केरळमधील एका नदीच्या किनारी भागावर अडकलेल्या फॉर्च्युनरला हत्तीच्या मदतीने बाहेर काढावे लागले. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. नदीच्या किनाऱ्यावर अडकलेली फॉर्च्युनर कशी काढायची असा प्रश्न पडला होता. फॉर्च्युनरचे वजन 1995 किलो इतके आहे, परंतु ही अडचण चुटकीसरशी संपली. हत्तीने ही कार अवघ्या काही मिनिटांत बाहेर काढली. या व्हिडीओला इन्स्टावर 20 लाख ह्यूज मिळाले आहेत.