गणेश विसर्जनासाठी गेलेल्या चार युवकांचा मृत्यू

661
sunk_drawn_death_dead_pic

गणेश विसर्जनासाठी गेलेल्या चार युवकांचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात असलेल्या वाठोडा शुक्लेश्वर येथे गुरुवारी सायंकाळी घडली.

भातकुली तालुक्यात असलेल्या गौरखेडा गावातील गणेश विसर्जनासाठी वाठोडा शुक्लेश्वर येथील पूर्णा नदीत गेले होते. गणपती विसर्जन करीत असताना काही तरूण नदीच्या पात्रात उतरले. मात्र त्याच वेळी गणेश विसर्जन करताना सतीश अजाबराव सोळंके (वय 18), ऋषीकेश बाबुराव वानखडे (वय 22), संतोष बारीकराव वानखडे (वय 45), व सागर अरुण शेंदूरकर (वय 20) नदीच्या पात्रात वाहून गेले. व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. गणेश विसर्जनाच्या वेळी पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असतानाही या सर्वांनी गणपती विसर्जन करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी ही घटना घडली.

दरम्यान चार तरूण नदीत बुडल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांचा शोध घेण्यासाठी घटनास्थळी बचाव पथक पाठविण्यात आले. मात्र आज सकाळपर्यंत एकाचा मृतदेह हाती लागला आहे. याप्रकरणी खल्लार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या