
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले. चकमकीत 17 लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या दोन महिलांसह चार नक्षलवाद्यांना पंठस्नान घालण्यात आले. बिजापूरच्या नैऋत्य भागातील बासगुडा आणि गंगलुर पोलिस ठाण्याच्या सीमावर्ती जंगलात नक्षलवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सुरक्षा दल आणि पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवली.
शनिवारी सायंकाळपासून सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. आज दुपारी ही चकमक संपली. या कारवाईत एक एसएलआर, एक इन्सास, एक 303 रायफल, एक 12 बोअर बंदूक, बीजीएल लॉँचर, सिंगल लॉट शस्त्र, मोठय़ा प्रमाणात स्पह्टके आणि नक्षल संबंधित इतर वस्तू जप्त करण्यात आल्या.
नक्षलग्रस्त भागात चार हजार मोबाईल टॉवर उभारणार
छत्तीसगमधील नक्षलग्रस्त भागात बीएसएनएल तब्बल चार हजार नवीन मोबाईल टॉवर उभारणार असल्याची माहिती दूरसंचार आणि ग्रामविकास राज्यमंत्री पेम्मासानी चंद्र शेखर यांनी दिली.