बिहारमध्ये चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त

बिहारमध्ये नक्षलवादी आणि सुरक्षा दलात झालेल्या चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. बिहारमधील पश्चिम चंपारण्य जिल्ह्यातील बगहा भागात सशस्त्र सीमा दलाचे जवान आणि स्पेशल टास्क फोर्सचे जवानांच्या संयुक्त पथकाने शोधमोहिम राबवली होती. त्यावेळी नक्षलवाद्यांनी गोळीबारास सुरुवात केल्यानंतर चकमकीला सुरुवात झाली. सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने केलेल्या कारवाईत चार नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या