
पुण्यात एका डॉक्टरचे अपहरण करून त्याच्याकडून खंडणी उकळल्याप्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपींमध्ये एका पोलीस कर्मचार्याचाही समावेश आहे.
हडपसरमध्ये एक महिला रुग्ण म्हणून डॉक्टरच्या दवाखान्यात गेली. अचानक तिने आरडाओरड केला. तेव्हा तिचे साथीदार आले आणि आपण पोलीस आहे असे सांगून डॉक्टरला एका ठिकाणी घेऊन गेले. त्यातील दोघांनी आपण पत्रकार असून पोलीस केस झाली तर दवाखान्याची आणि तुमची बदनामी होईल अशी भिती दाखवली. नंतर डॉक्टरला धमकावत 10 लाख रुपयांची खंडणी मागितली. तडजोडीअंती डॉक्टरने त्यांना 7 लाख देण्यास कबुल केले. डॉक्टरांनी कसेबसे 5 लाख 89 हजार रुपये दिले आणि कशीबशी आपली सुटका करून घेतली.
जेव्हा डॉक्टर या टोळीच्या सुटकेतून बाहेर पडले तेव्हा त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली आणि तक्रार केली. याप्रकरणी पोलिसांनी दोन महिलांसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करून चार जणांना अटक केली आहे. त्यात समीर जगन्नाथ थोरात या पोलीस कर्मचार्याचाही समावेश आहे. समीर थोरात हा पुणे पोलीस येथे कर्तव्यावर आहे पोलिसांनी जारी केलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. सदर गुन्हयातील आरोपी हे सराईत असुन ते अशाप्रकारे प्रतिष्ठित डॉक्टरांचा शोध घेवन त्यांना सावज करुन अशाप्रकारे त्यांच्याकडुन मोठमोठी रक्कम खंडणी स्वरुपात घेवुन गुन्हे करत असल्याची माहीती मिळाली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

























































