सांगली जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने, चौघांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह

918

सांगली जिल्ह्यात ज्या चार जणांनी कोरोनाची लागण झाली त्या चारही रुग्णांचा आज 14 दिवसांनंतर पहिला अहवाल निगेटिव्ह आला आहे.  त्यामुळे सांगली जिल्ह्याची वाटचाल कोरोना मुक्तीच्या दिशेने सुरू झाली आहे. सांगलीकरांसाठी ही अत्यंत दिलासादायक अशी बातमी आहे.

सौदी अरेबियाहून आलेल्या या चार जणांना होम क्वारंटाईनचा आदेश असताना ते बाहेर पडले आणि दोन दिवसात त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यातर त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु तोपर्यंत त्यांच्यामुळे आणखी 21 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.  जिल्ह्यात एकूण पंचवीस जणांना कोरोनाची लागण झाली. हे 25 जण एकाच कुटुंबातील आहेत. सर्व  रुग्णांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यातील या पहिल्या चार कोरोनाग्रस्ताचा 14 दिवसांचा कालावधी आज संपला. चौदा दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांची आज पहिली टेस्ट घेण्यात आली. त्यात 14 जण निगेटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं उर्वरित 21 जणांचे सोमवारी स्वॅब घेण्यात येणार आहेत.

उर्वरित 21 जणांचे रिपोर्ट सोमवारी संध्याकाळपर्यंत अपेक्षित आहे.  पहिला आणि दुसरा दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास या 25 रुग्णांना हॉस्पिटलमधून सोडण्यात येणार असल्याचे आरोग्य प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या