
पुण्यातील एका सोसायटीमध्ये झालेल्या वादात धमकावल्यामुळे एका व्यक्तीने फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटनेचा उलगडा व्हिडिओ रोकॉर्डिंगमधून झाला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी गोवींद कदम, श्रीकांत घोडके, बसवराज कणजे, खेमराज देसाई (सर्व रा. शिवगंगा हाईट्स, कोंढवा खुर्द) यांना अटक केली आहे. विजय दशरथ कवडे (वय 41 रा. शिवगंगा हाईट्स, कोंढवा खुर्द) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मंगल भोलेनाथ कवडे (वय 36) यांनी तक्रार दिली आहे.
पोलीस उपनिरीक्षक निकेतन निंबाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, किरकोळ कारणावरून आरोपींनी विजय कवडे यांना वेळोवेळी त्रास दिला होता. ऑगस्टमध्ये अंगावर धावत जात त्यांच्या मुलाला शिवीगाळ करून धमकी दिल्याने कवडे यांनी 14 ऑगस्टला राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. विजय कवडे यांनी आरोपींची नावे घेऊन आत्महत्या करत असल्याचे व्हिडीओ रेकॉडींग गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांच्या हाती लागले. गुन्ह्याचा उलगडा झाल्यानंतर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संबंधिताना अटक करण्यात आली आहे.






























































