नवरात्र पाचवा दिवस – वाचा अष्टभुजाधारी कूष्मांडाचे अनन्यसाधारण महत्त्व

नवरात्रीतील चौथा दिवस हा कूष्मांडा देवीला समर्पित केला जातो. कूष्मांडा ही दुर्गा देवीचे चौथे स्वरुप आहे. कूष्मांडा देवी अष्टभुजाधारी असून, देवीने बाण, चक्र, गदा, अमृत कलश, कमळ, कमंडलू, सिद्धी आणि निधींची माळ आदी भुजांमध्ये धारण केले आहे. तिचे वाहन सिंह असून, कूष्मांडा ही सिंहावर स्वार झाली आहे.

कूष्मांडा देवीचे पूजन

सकाळी लवकर उठून अंघोळ झाल्यानंतर, कूष्मांडा देवीच्या पूजनाचा संकल्प करावा. कूष्मांडा देवीचे पूजन करताना लाल रंगाची फुले, जास्वंद किंवा गुलाबाचे फूल आवर्जुन वहावे. यानंतर धूप, दीप आणि नैवेद्य दाखवावा. देवीचे पूजन करताना हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते. कूष्मांडा देवीला पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा. यामध्ये दही, साखर फुटाणा असावा.

कूष्मांडा देवीचा मंत्र

कूष्मांडा देवीचे पूजन करताना तसेच पूजनानंतर पुढील मंत्र म्हणावा.

– ॐ देवी कूष्माण्डायै नमः॥

– या देवी सर्वभू‍तेषु माँ कूष्माण्डा रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

कूष्मांडा देवीची माहिती

नवरात्रीमधील चौथ्या स्वरुपाचे नाव कूष्मांडा आहे. या देवीचे निवासस्थान सूर्यमंडळात असून, याठिकाणी निवास करण्याची शक्ती केवळ तिच्यामध्येच आहे. कूष्मांडा देवीची उपासना केल्यामुळे आजार बरा होतो. तसेच या देवीच्या भक्तीमुळे आयुष्य, यश, शक्ती आणि आरोग्यामध्येही वाढ होते. पूर्णपणे देवीला शरण गेला, तर त्याला शांती आणि समृद्धीच्या वाटेवर जाता येते.