#FarmerProtest – आता ‘फ्रान्स’मध्येही शेतकरी आंदोलन

हिंदुस्थानानंतरआता फ्रान्समध्येही शेतकरी आपल्या शेतमालाला हमीभाव मिळावा म्हणून आंदोलन करत आहेत. गेल्या एक महिन्यापासून फ्रेंच शेतकर्‍यांच्या अनेक संघटना देशाच्या विविध भागात सरकारच्या धोरणाविरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत.

राजधानी पॅरिसमध्ये शेतकऱ्यांनी पुतळ्यांना झाडावर टांगून आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांना श्रद्धांजली वाहिली. हे शेतकरी देशभरातील सुपरमार्केट आणि वितरण केंद्राबाहेर निषेध करत आहेत.

देशातील आर्थिक असमानता, शेतकर्‍यांचे घटते उत्पन्न आणि धान्याच्या किंमतीत कपात यासारखे प्रश्न सरकारने तातडीने सोडवावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. फ्रान्समध्येही मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांना त्याच्या शेतमालाला योग्य तो हमीभाव मिळत नाही. आपल्या शेतमालाला योग्य तो हमीभाव मिळावा म्हणून मोठ्या प्रमाणात शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या