खात्यामधून 90 हजार काढून फसवणूक

डिमॅट खाते उघडून त्यामध्ये भरलेले 90 हजार रुपये परस्पर काढून घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी अनोळखी मोबाईलधारकाविरुध्द देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विठ्ठल सुधाकर कुलकर्णी महाई सेवाकेंद्र वलांडी यांनी देवणी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. या तक्रारीत त्यांनी नमूद केले आहे की, मोबाईल क्रमांक 9126693870 या मोबाईल धारकाने तक्रारदारास डिमॅट खाते काढून त्यामध्ये 1 लाख जमा करा. महिन्याला 10 हजार रुपये नफा मिळतो असे सांगितले.

त्यामुळे विठ्ठल कुलकर्णी यांनी खाते काढून त्यामध्ये 90 हजार रुपये भरले मात्र ही रक्कम परस्पर संबंधित मोबाईलधारकाने काढून फसवणूक केली. देवणी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या