दहा हजारांहून अधिक जणांना गंडा घालणाऱ्या टोळीतील आरोपी जयगडात सापडला

एचपी गॅसची एजन्सी मिळवून देतो असे सांगून बनावट वेबसाईट तयार करत विविध राज्यातील अनेक नागरीकांची फसवणूक करणारी टोळी मुंबई सायबर पोलीसांनी जेरबंद केली आहे. या टोळीतील एक आरोपी रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथे येऊन लपला होता. त्यालाही रत्नागिरी पोलीसांच्या मदतीने मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बनावट वेबसाईट तयार करुन डी.के.वर्मा या नावाने बतावणी करुन आम्ही एलपीजी गॅसचे प्रतिनिधी आहोत. आम्ही तुम्हाला एचपी गॅसच्या एजन्सीची डिलरशीप देऊ अशी बतावणी करुन फसवणूक केली जात होती. अनेक राज्यातील नागरीकांना या टोळीने गंडा घातला होता. बिहार येथे कारवाई सुरु असल्याचा मागोवा घेऊन एका आरोपीने रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथे येऊन आसरा घेतला. त्याला रत्नागिरी पोलीसांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले. ई मेलद्वारे बनावटीकरण केलेली कागदपत्रे पाठवून व्हॉटसअॅपद्वारे चॅटींग करुन अनेक नागरीकांना गंडा घालण्यात आला. देशातील 10 हजार 531 नागरीकांची 10 कोटी 13 लाख रुपयांची फसवणूक झालेली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या