
गेल्या काही काळापासून सायबर गुन्हेगारांसाठी QR कोड एका शस्त्रासारखं ठरत आहे. तुम्हीही QR कोड स्कॅन करून पेट्रोल पंप किंवा दुकानदारांना ऑनलाइन पैसे दिले असतील. मात्र तुम्हाला माहीत आहे की, QR कोड स्कॅन करताना कधी कधी तुमची फसवणूक देखील होऊ शकते.
Quick Response (QR) सर्वात आधी जापान मध्ये तयार करण्यात आले. आता हिंदूस्थानात याचा प्रचंड वापर केला जातो. मात्र याचा वापर करताना तुम्ही सावधगीरी बाळगली नाही तर तुम्ही या फसव्या जाळ्याची शिकार होऊ शकतात. आम्ही येथे QR कोड फिशिंग काय आहे आणि यापासून कसे वाचता येईल हे सांगत आहोत.
सायबर गुन्हेगार आपल्या घाईचा फायदा उचलतात. ते QR कोड बदलून टाकतात. म्हणजे पैसे थेट गुन्हेगाराच्या खात्यात जमा होतात. त्याच QR कोडला बदलून अन्य कोणता तरी QR कोड ठेवण्यालाच QR फिशिंग म्हणतात. यामुळे QR ने दिलेले पैसे दुकानदारास न जाता सायबर गुन्हेगाराच्या खात्यात जातात.
QR कोड फिशिंगच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. यामध्ये फसवणूक करणारी व्यक्ती तुम्हाला मेसेज किंवा ई-मेल द्वारे QR कोड सेंड करू शकतो. ज्यामध्ये 10,000 ची लॉटरी लागली आहे अशा प्रकारचे काही प्रलोभन दाखवले जाते. ज्यामध्ये यूपीआय पीन देऊन पैसे आपल्या बँकेच्या खात्यात टाकणार असल्याचे आमिश दाखवले जाते.
तुम्ही QR कोड स्कॅन केल्यावर यूपीआय पिन मागितला जाईल. तुम्हाला वाटतं पैसे तुमच्या खात्यात येतील. मात्र यूपीआय पीन दिल्यावर फसवणूक करणारी व्यक्ती तुमच्या बँकेच्या खात्यातील रक्कम आपल्या खात्यात घेऊ शकेल.
अशाच प्रकारे पेट्रोल पंप किंवा कुणी दुकानदाराकडे QR कोड स्कॅन करून त्यांना पेमेंट करत असतो. तिथे एखाद्या फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने बदलून दुसरा QR कोड देखील लावला असण्याची शक्यता आहे. ज्यामुळे QR कोड स्कॅन केल्यावर होणारे पेमेंट स्कॅमरच्या अकाउंटमध्येच ट्रांसफर होतात.
अशा फसवणूकीपासून स्वत:ला वाचवण्यासाठी QR कोड स्कॅन करून पेमेंट करताना सावधानता बाळगा. QR कोड स्कॅन केल्यावर त्यामध्ये रिसीव्हरचे नाव काय आहे ते एकदा तपासून पहा. मेसेज किंवा ई-मेल किंवा एखाद्या अनोळख्या ठिकाणाहून मिळालेला QR कोड स्कॅन करणे टाळा.
QR कोडला फोनच्या कैमऱ्याने स्कॅन करण्याऐवजी असे अॅप वापरा ज्यामध्ये QR कोडच्या डिटेल्स देखील दाखवल्या जातात. झालेल्या कोणत्याही चुकीच्या ट्रांझॅक्शनवर तातडीने अॅक्शन घ्या. अशी फसवणूक झाल्यास साइबर सेलकडे तक्रार करा.




























































