
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेबसाईट www.narendramodi.in मध्ये काही त्रुटी आहेत . असा इशारा फ्रान्सचा एथिकल हॅकर एलियट एंडरसन याने दिला आहे. मोदींची वेबसाईट सुरक्षित नाही. यामुळे वेबसाईट सुरक्षित करण्यासाठी तुम्हाला माझ्याशी संपर्क करणे गरजेचे आहे. असेही एलियटने आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.
एलियटने टि्वटमध्ये एक स्क्रिनशॉट शेअर केला आहे. त्यात हाय @narendramodi, तुमच्या वेबसाईटमध्ये काही त्रुटी आढळल्या आहेत. एका अज्ञात सूत्राने माझ्या नावाने तुमच्या वेबसाईटवर एक फाईल अपलोड केली आहे. त्याच्याजवळ तुमच्या डेटाबेसचा संपू्र्ण एक्सेस आहे. त्यामुळे वेबसाईट सुरक्षित करण्यासाठी तुम्ही लवकरात लवकर मला संपर्क करावयास हवा असेही एलियटने म्हटले आहे. तसेच त्यानंतर त्याने अजून एक टि्वट केले असून त्यात http://narendramodi.in च्या टीमने माझ्याशी संपर्क केला असून वेबसाईटमधील त्रुटी करण्याच्या कामाला ते लागले आहेत. चाचणी केल्यावर संबंधित त्रुटीमुळे फक्त सबडोमेन वर परिणाम झाल्याचे एलियटने सांगितले आहे.























































