फ्रेंच ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम; नदालचा जेतेपदाचा मार्ग खडतर

13 वे फ्रेंच ओपन जेतेपद आणि 20 वे ग्रॅण्डस्लॅम जेतेपदाचे स्वप्न उराशी बाळगलेल्या स्पेनच्या रफाएल नदालचा आगामी फ्रेंच ओपन स्पर्धेतील मार्ग सोप्पा नसणार आहे. फ्रेंच ओपन ही प्रतिष्ठsची स्पर्धा यंदा 27 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर या कालावधीत रंगणार आहे. तब्बल सहा महिन्यांनंतर टेनिस कोर्टवर उतरणाऱया रफाएल नदालसमोर पुरुष एकेरीत तगडय़ा प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान असणार आहे. तसेच ऍण्डी मरे व स्टॅन वावरिंका यांच्यामधील सलामीची लढत उत्कंठावर्धक ठरील यात शंका नाही.

सेरेनाचे मिशन सुरूच

24 वे ग्रॅण्डस्लॅम जिंकून मार्गरेट कोर्टच्या सर्वाधिक ग्रॅण्डस्लॅम जेतेपदाची बरोबरी करण्याचे ध्येय सेरेना विल्यम्स हिने बाळगले असून अमेरिकन ओपन स्पर्धेत तिला अपयशाचा सामना करावा लागला. आता फ्रेंच ओपन स्पर्धेत ती आपले अपुरे मिशन पूर्ण करण्याचा प्रयत्न करील. सलामीच्या लढतीत तिच्यासमोर ख्रिस्ती ऍनचे आव्हान असेल.

चार अव्वल महिला खेळाडूंची माघार

महिला एकेरीत अव्वल दहा खेळाडूंपैकी फक्त सहाच टेनिसपटू फ्रेंच ओपन स्पर्धेत सहभागी होणार आहे. नाओमी ओसाका, ऍश बार्टी, बियांका आंद्रेस्क्यू व बेलिंडा बेनसीच या महिला खेळाडूंनी या स्पर्धेमधून माघार घेतली आहे. पुरुषांच्या गटातून मिलॉस राओनिच यानेही फ्रेंच ओपन स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रेक्षकांकिना स्पर्धा?

प्रेंच ओपन स्पर्धेसाठी स्टेडियममध्ये किती प्रेक्षकांना परवानगी द्यायची याबाबत आयोजक व सरकार यांच्यामध्ये योग्य समन्वय नसल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे. एकीकडे आयोजक पाच हजार टेनिसप्रेमींना स्टेडियममध्ये परवानगी देण्यासाठी इच्छुक असून दुसरीकडे सरकार कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे फक्त एक हजार क्रीडाप्रेमींना परवानगी देत आहे. प्रान्स सरकारकडून गुरूवारी फक्त एक हजार क्रीडाप्रेमींना परवानगी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या नियमाप्रमाणे स्पर्धा पार पडल्यास स्टेडियममध्ये एकही प्रेक्षक नसणार आहे. कारण खेळाडू, सामनाधिकारी, आयोजक, बॉल बॉईज, मीडिया, स्टाफ यांची संख्या मिळून हजारापेक्षा पुढे जाते.

स्पेनच्या टेनिसपटूला या खेळाडूंचा सामना करावा लागणार

  • पहिली फेरी – इगोर गेरासिमोव (बल्गेरिया)
  • अंतिम आठमध्ये – ऍलेक्झॅण्डर झ्वेरेव (जर्मनी)
  • सेमी फायनलमध्ये – डॉमिनिक थीम (ऑस्ट्रीया)
आपली प्रतिक्रिया द्या