
ब्रिटनच्या दक्षिण कोर्निश समुद्रकिनारी निळ्या रंगाचा झिंगा (ब्ल्यू लॉबस्टर) सापडला आहे. अत्यंत दुर्मीळ असा मासा सापडल्याने सगळे चकीत झाले आहेत. एका मच्छिमाराच्या जाळ्यात तो सापडला. मच्छिमाराने दिलेल्या माहितीनुसार, त्याची बोट 15 ते 18 फूट खोल पाण्यात होती, त्यावेळी त्याला जाळ्यात हा अनोखा ंिझगा दिसला. साधारणपणे करडय़ा किंवा लाल रंगाचे झिंगा असतात. मात्र असा निळा झिंगा कधी पाहिला नाही, असे वयाच्या 11 व्या वर्षापासून मासेमारी करणार्या क्रिस पुके यांनी सांगितले.
ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या जैवविज्ञान तज्ञांच्या मते निळा झिंगा पकडण्याची शक्यता 20 लाखात एक असते. या अतिदुर्मीळ झिंग्याला सुरक्षेसाठी मत्स्यालयात ठेवण्यात आलंय. दुसऱया जाळ्यात अडकू नये किंवा अन्य मासे त्याला खातील, म्हणून ही खबरदारी घेण्यात आलेय.



























































