Health – फळे, भाजीपाला सॅनिटायझरने धुताय? होऊ शकते ‘हे’ मोठे नुकसान

कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी सॅनिटायझरचा वापर करून हात धुण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र सॅनिटायझर वापरताना काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कोरोना विषाणूला घाबरून सॅनिटायझरचा अधिक वापर करणेही घातक ठरत आहे. अनेकदा काही लोक हातासह खाण्या-पिण्याच्या वस्तूही सॅनिटायझरने धुतात. बाजारातून आणलेल्या पालेभाज्या, फळ आणि इतर वस्तूही सॅनिटायझरने धुतल्या जात आहेत. मात्र असे करणे शरीराला घातक ठरत आहे.

vegetables

सॅनिटायझरने खाण्या-पिण्याच्या वस्तू धुतल्याने याचा थेट परिणाम शरीरावर होऊ शकतो. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

– सॅनिटायझरचा वापर फक्त हात आणि धातूपासून बनवलेल्या वस्तू धुण्यासाठी करावा असे तज्ज्ञ सांगतात.

– बाजारातून एखादी वस्तू आणल्यास 4 तास त्याचा वापर करू नये. यामुळे त्यावर कोरोना विषाणू असेल तर नष्ट होईल.

pune-fruit-market

– सॅनिटायझर वापरण्याऐवजी पाण्यात पोटॅशियम केमिकल टाकून वस्तू साफ केल्या जाऊ शकतात.

– खाण्या-पिण्याच्या वस्तू सॅनिटायझरने धुतल्याने पोटाचे विकार होऊ शकतात.

– घातक केमिकलमुळे इन्फेक्शनही होण्याचा धोका असतो.

– त्यामुळं गरम पाणी किंवा बेकिंग सोडा पाण्यात टाकून त्याद्वारे तुम्ही त्या वस्तू साफ करू शकता.

आपली प्रतिक्रिया द्या