फुलराणी आता रुपेरी पडद्यावर!

643

जॉर्ज बर्नाड शॉ या प्रतिभावान लेखकाच्या अनेक कलाकृतींची आजवर वेगवेगळी यशस्वी माध्यमांतर झाली आहेत. त्यांच्या ‘पिग्मॅलिअन’ या गाजलेल्या नाटय़कृतीकर 1964 साली आलेली ‘माय फेअर लेडी’ ही म्युझिकल फिल्म ही चांगलीच गाजली होती. आता याच ‘पिग्मॅलिअन’ कलाकृतीने प्रेरित होऊन ‘फुलराणी’ हा चित्रपट रुपेरी पडद्यावर येऊ घातला आहे.

दिग्दर्शक विश्वास जोशी यांनी हे शिवधनुष्य उचलले आहे. नुकतेच या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या नव्या कलाकृतीचे लेखन विश्वास जोशी व गुरु ठाकूर यांनी केले आहे. सर्वस्की नव्या स्वरूपातील ‘फुलराणी’ प्रेक्षकांना या चित्रपटातून पहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात आहे. बालकवी यांच्या गाजलेल्या ‘फुलराणी’ या कवितेकरूनच या चित्रपटाचे शीर्षक घेण्यात आले आहे. या कवितेला संगीतकार निलेश मोहरीर न या स्वरूपात संगीतबद्ध करणार आहेत. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होईल.

आपली प्रतिक्रिया द्या