#JCBKiKhudayi सोशल मीडियावर जेसीबीच्या खोदकामाचे ‘मिम्स’ का व्हायरल होताहेत?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सोशल मीडियावर कधी आणि काय व्हायरल होईल याचा भरवसा नाही. सध्या सोशल मीडियावर जेसीबीच्या खोदकामाचे ‘मिम्स’ व्हायरल होत आहेत. जेसीबीच्या खोदकामाचे व्हिडीओही व्हायरल होत असून एका व्हिडीओला तब्बल 40 लाख लोकांनी पाहिले आहे. तसेच व्हायरल होणाऱ्या मिम्सलाही मोठा प्रतिसाद मिळत आहे.

ट्विटरवर सध्या #JCBKiKhudayi हा ट्रेंड टॉपमध्ये आला आहे. जेसीबीचे खोदकाम पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक गर्दी करत आहेत, तसेच रेल्वेच्या रेल्वे भरून जेसीबीचे खोदकाम पाहायला लोकं येत आहेत, असे मिम्स सध्या प्रचंड व्हायरल झाले आहेत. ट्विटरवर #JCBKiKhudayi हा ट्रेंड टॉपमध्ये आल्यानंतर अनेकांना हा प्रकार आहे तरी काय हे कळाले नाही. तसेच खुद्द जेसीबी कंपनीने या ट्रेंडबाबत आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर, ‘वा काय दिवस आहेत’, असे ट्वीट केले आहे. यासोबत #JCBkiKhudai #JCBkiKhudayi हा हॅशटॅगही वापरला आहे.

म्हणून जेसीबी ट्रेंडमध्ये…
बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी पोर्नस्टार सनी लिओनी हिने जेसीबीसोबत एक फोटो सोशल मीडियावर टाकला होता. फोटोमध्ये सनी जेसीबी मशिनवर उभी असलेली दिसत आहे. या फोटोसोबत सनीने यानंतर ट्विटरवर Career change!? LOL असे कॅप्शन दिले आहे. यानंतर #JCBKiKhudayi हा ट्रेंड टॉपमध्ये आला आहे.