
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील प्रथम वर्ष पदवी (एफवाय) अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी दुसरी मेरीट लिस्ट आज जाहीर करण्यात आली. या दुसर्या यादीमध्ये कटऑफ पाच ते आठ टक्क्यांनी कमी झाला आहे. बारावी परीक्षेचा राज्य शिक्षण मंडळाचा निकाल यंदा कमी लागल्याने कटऑफ कमी असेल अशी अपेक्षा होती. मात्र सीबीएसई, आयसीएसई बोर्डांचे निकाल चांगले असल्याने नामांकित महाविद्यालयांचा कटऑफ अजूनही जास्तच आहे.
पहिली कटऑफ मेरीट 93 टक्क्यांपर्यंत होती. दुसर्या यादीत कटऑफ 80-85 टक्क्यांवर घसरला आहे. दुसर्या यादीतच अनेक महाविद्यालयांमधील जागा भरल्या गेल्याने तिसरी यादी जाहीर होण्याची शक्यता जवळजवळ कमीच झाली असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे 70-80 टक्के मिळवणार्या विद्यार्थ्यांचे काय होणार असा प्रश्न पडला आहे.
एचआर कॉलेज
वाणिज्य – 93 टक्के, विज्ञान – 89.20 टक्के, कला – 88.20 टक्के
केसी कॉलेज
कला – 93 टक्के, वाणिज्य – 92 टक्के, विज्ञान 74 टक्के
मिठीबाई कॉलेज
वाणिज्य – 95 टक्के, विज्ञान – 89 टक्के, कला – 86 टक्के
विल्सन कॉलेज
वाणिज्य – 90 टक्के, विज्ञान – 85 टक्के, कला – 75 टक्के
वझे– केळकर कॉलेज
वाणिज्य – 86.62 टक्के, कला – 88.15 टक्के, विज्ञान – 74.77 टक्के
एस. के. सोमय्या कॉलेज
वाणिज्य – 77 टक्के, विज्ञान – 71 टक्के, कला – 70 टक्के
रुईया कॉलेज
कॉमर्स – 91 टक्के, कला – 89.75 टक्के, विज्ञान – 87.8 टक्के





























































