
अकरावी ऑनलाइन प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी 4 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता जाहीर होणार आहे. या यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांसाठी संबंधित कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेण्यासाठी 6 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. राज्यातील पुणे, नाशिक, नागपूर, मुंबई आणि अमरावती महापालिका क्षेत्रात अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या एकूण 2 लाख 57 हजार 447 जागा रिक्त असून या जागांसाठी दुसऱया गुणवत्ता यादीत 1 लाख 96 हजार 518 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.
मुंबई विभागातून दुसऱया यादीसाठी आर्टस्, सायन्स, कॉमर्स आणि एचसीवहीसी शाखेच्या मिळून एकूण 1 लाख 39 हजार 794 जागा असून दुसऱया यादीसाठी एकूण 1 लाख 33 हजार 723 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.
पहिल्या गुणवत्ता यादीत पहिल्या पसंतीचे कॉलेज नाकारलेल्या 10 हजार 751 विद्यार्थ्यांना या यादीत प्रकेशाची संधी दिली जाणार नाही.
विभागनिहाय आलेले प्रवेशअर्ज, उपलब्ध जागा
विभाग रिक्त जागा प्रवेशअर्ज
पुणे 63682 35694
नाशिक 13270 9837
नागपूर 32765 12867
अमरावती 7936 4397
मुंबई 139794 133723

























































