
गडचिरोली आज एकाच दिवशी राज्य राखीव दलाच्या 72 जवानांसह अन्य एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ माजली आहे. आजपर्यंतचा कोरोनाबाधितांचा जिल्ह्यातील हा सर्वांत मोठा आकडा आहे. आतापर्यंत आढळलेल्या एकूण कोरोना पॉझिटीव्ह 279 व्यक्तींमध्ये 205 जण पोलीस दलातील आहेत.
आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधित आढळलेल्या व्यक्तींमध्ये पोलीस दलातील जवानांची संख्या अधिक आहे. सीआरपीएफचे 88, एसआरपीचे 115 व बीआरओचे 2 असे 205 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. हे रुग्ण आता बरेही होऊ लागले आहेत.






























































