गडनदी धरण भरले; नदीकिनारच्या गावांना सतर्कतेच्या सूचना

560

संगमेश्वर तालुक्यातील गडनदी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणाची संचय क्षमता 126.15 मिटर असून आजची पाणी पातळी 120.55 मीटर एवढी आहे. सध्या धरणात एकूण 64.88 दलघमी पाणीसाठा असून त्यातील उपयुक्त पाणीसाठा 64.56 दलघमी एवढा आहे .गडनदी धरणातून पहाटे 5 वाजता सांडव्याद्वारे पाणी नदीपात्रात जाण्यास सुरुवात झाली, अशी माहीती गडनदी प्रकल्प उपविभाग कुचांबेच्या शाखा अभियंता निकिता हजारे यांनी दिली.

शेतकरी वर्गाने नदीपात्रात उतरु नये, स्वतःसह जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन शोतकऱ्यांना करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठा गडनदी मध्यम पाटबंधारे प्रकल्प हा येथील शेतकऱ्यांना वरदान आहे. धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाला असून सांडव्याद्वारे पाणी नदीपात्रात जाण्यास सुरुवात झाली आहे. सध्या गडनदी धरण क्षेत्रात पावसाला जोर असून 6 जुलै रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत एकूण 1142 मि.मी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर गेल्या 24 तासांत 68 मि.मी पावसाची नोंद झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या