पंधरा दिवसांत अग्निशमन यंत्रणा उभारा, अन्यथा वीज-पाणी कापणार! सांताक्रुझच्या गॅलेक्सी हॉटेलला पालिकेची नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सांताक्रुझच्या गॅलेक्सी हॉटेलला लागलेल्या आगीत तिघांचा मृत्यू झाल्याची गंभीर दखल पालिकेच्या अग्निशमन दलाने घेतली असून अग्निशमन यंत्रणा नसल्यामुळे हॉटेल प्रशासनाला नोटीस बजावण्यात आली आहे. पंधरा दिवसांत अग्निशमन यंत्रणा उभारा, अन्यथा वीज-पाणी कापण्याचा इशारा नोटीसमधून देण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख रवींद्र आंबुलगेकर यांनी दिली.

सांताक्रुझ पूर्व प्रभात कॉलनी येथील गॅलेक्सी या चार मजली हॉटेलला रविवारी लागलेल्या आगीत तिघांचा मृत्यू झाला, तर दोघे जण जखमी झाले. प्राथमिक पाहणीत ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलाकडून या हॉटेलची अग्निशमन दलाकडून आज तपासणी करण्यात आली. मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संबंधित हॉटेलला नोटीस बजावण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 1966 पासूनचे बांधकाम असल्याने तेव्हा अग्निशमन यंत्रणा असणे अनिवार्य नव्हते. मात्र यानंतर अग्निशमन यंत्रणा असणे अनिवार्य बनल्यामुळे संबंधितांनी ही यंत्रणा बसवणे आवश्यक होते. मात्र याकडे दुर्लक्ष केल्यामुळे नोटीस बजावण्यात आली आहे.

अशी घडली दुर्घटना…
गॅलक्सी हॉटेलला दुपारी सवाच्या वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. आगीमुळे काही केळातच धुराचे लोट पूर्ण हॉटेलभर पसरले. त्यामुळे हॉटेलमधील कर्मचारी आणि ग्राहकांनी हॉटेलबाहेर धाव घेतली. मात्र, पहिल्या आणि दुसऱया मजल्यावर पसरलेल्या आगीमुळे तिसऱया मजल्यावर पाच जण अडकून पडले. घटनेची माहिती समजताच मुंबई अग्निशमन दलाच्या जकानांनी घटनास्थळी धाक घेतली.

हॉटेलमध्ये तिसऱया मजल्यावर अडकलेल्या पाच जणांना बाहेर काढून सांताक्रुझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल केले. मात्र रूपल कांजी , किशन आणि कांतिलाल व्होरा या तिघांचा मृत्यू झाला. तर अल्फा वखारिया व मंजुला वखारिया या जखमी झालेल्या दोघांना सांताक्रुझच्या व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.