उंदीर गजाननाचे वाहन कसा झाला?

एके दिवशी इंद्राच्या सभेत्त क्रौंच नावाच्या एका गंधर्वाची लाथ चुकून नामदेव नावाच्या ऋषीला लागली. त्याने “तू भयंकर मूषक होशील” असा शाप दिला. त्याप्रमाणे तो गंधर्व लगेच मूषक होऊन पराशराच्या आश्रमाजवळ येऊन पडला व उपजत स्वभावानुसार त्याने पराशराच्या आश्रमातील धान्याची नासाडी करण्यास सुरुवात केली. तेव्हा गजाननाने आपला पाश त्या मूषकावर टाकला. त्यामुळे तो मूषक विव्हळू लागला व तो गजाननाची करुणा  भाकू लागला. हे पाहून गजानन त्या मूषकास म्हणाला, “तू वाटेल तो वर मागून घे.” तेव्हा तो मूषक म्हणाला, “मला तुमच्याकडून कोणताही वर नको.” हे ऐकून गजानन त्यास म्हणाला, “मग तू माझे वाहन हो.”

लागलीच गणपती त्या मूषकावर स्वार झाला. त्याच्या भाराने तो मूषक अतिदीन झाला. तेव्हापासून उंदीर गणपतीचे वाहन झाला.

आपली प्रतिक्रिया द्या